video
उन्हामध्ये मोटरसायकलला लागली आग, व्हिडिओ पाहून थरकाप उडेल
बाइक में आग लग जाए तो उससे दूर रहे नतीजा आपके सामने है 😓😓 pic.twitter.com/GqgWN2Y5M5
— कर्ण चौधरी नागौर (@krchoudhary0789) May 17, 2024
बाईक अनेकांच्या जिव्हाळ्याचा विषय. तरूणाईमध्ये या बाईकची क्रेझ दिसते. अनेकजण आपल्या बाईकला एवढं जपतात की त्यावर आलेला एक ओरखडाही त्यांना सहन होत नाही. पण सध्या एक व्हीडिओ वाऱ्या सारखा व्हायरल होतोय. यात नव्या कोऱ्या बाईला आग लागलेली पाहायला मिळतेय.उष्णतेचे वातावरण आहे, सर्वत्र उष्णतेच्या लाटेची दहशत आहे. अशा परिस्थितीत माणसे आणि वाहनेही उष्णतेचे बळी ठरत आहेत.
Today’s video :- बाईईईई.. नवऱ्याने ब्रेकअप केलं म्हणून बाईने असा घेतला बदला.Video
रोज बाइक आणि कार जाळल्याचे व्हिडीओ समोर येतात. अशा परिस्थितीत सोशल मीडियावरही वाहनांना आग लागल्याच्या बातम्या येत आहेत. या कडाक्याच्या उन्हाळ्यात जर तुम्हाला बाईक किंवा कार जळताना दिसली तर तुम्हीही काळजी घेणे आवश्यक आहे. कारण यात तुमचा जीवही जाऊ शकतो. असाच एक व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.
या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता, ज्यामध्ये बाईकला आग कशी लागली हे बघायला मिळते, एखादी व्यक्ती आग विझवायला जाताच बाईकमध्ये मोठा स्फोट होतो आणि ती व्यक्ती जिवंत जळून खाक होते.हो तुम्ही जे वाचताय ते खरंच घडलंय.
या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता, बाईकस्वाराच्या बाईकमधून धूर कसा निघतोय हे दिसत आहे. बाईकमधून धूर निघत असल्याचे पाहून तिथे उपस्थित लोकांनी बाईकवर पाणी ओतण्यास सुरुवात केली. अशा स्थितीत दुचाकीस्वारही त्याच्या दुचाकीकडे धूर कुठून येत आहे.
ते जवळून पाहण्याचा प्रयत्न करतो. आजूबाजूचे लोक पाण्याच्या पाईपमधून आग विझवण्याचा प्रयत्न करताना दिसत आहेत. यावेळी अचानक स्फोट होतो आणि बाईक पेटू लागते. या अपघातात जवळ जवळ बरेच लोक आगीच्या भक्ष्यस्थानी सापडतात.
त्याच्या संपूर्ण शरिराला आग लागते, अशा परिस्थिती ते रस्त्यावरच इकडे तिकडे पळू लागतात. व्हिडीओ पाहिल्यानंतर तुमच्याही अंगावर काटा येईल. कारण प्रखर उन्हात एखाद्याला आग लागणे हे धक्कादायक आणि हृदय पिळवटून टाकणारे आहे. त्याचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे, त्यानंतर यूजर्स त्यावर कमेंट करत आहेत.Shocking video
बाइक में आग लग जाए तो उससे दूर रहे नतीजा आपके सामने है 😓😓 pic.twitter.com/GqgWN2Y5M5
— कर्ण चौधरी नागौर (@krchoudhary0789) May 17, 2024
